Marathi News> विश्व
Advertisement

190च्या स्पीडवर गाडी नेल्यावर महिला म्हणाली, "देवा आता तुझ्या हातातच स्टेरिंग असू दे"

या महिलेनं कार चालवताना कारची स्पीड 190 km/hr नेली आणि त्याचे स्टीयरिंग सोडून दिले.

190च्या स्पीडवर गाडी नेल्यावर महिला म्हणाली,

मुंबई : रस्त्यावर अनेकदा अपघात होतात. कधी ड्रायव्हरच्या स्वतःच्या चुकांमुळे तर कधी समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे हे अपघात घडतात. परंतु एका महिलेने जे केलं हे जाणून घेतल्यावर तुम्ही म्हणाल की, तिच्यापेक्षा जगात कुणीही मूर्ख व्यक्ती नसेल. अस या महिलेला बोलण्यामागचे कारण ही तसेच आहे. या महिलेनं जे केलं हे करण्याचं धाडस कोणीही करणार नाही. कारण हे धाडस नाही तर हा शुद्ध मुर्खपणा आहे.

या महिलेनं कार चालवताना कारची स्पीड 190 km/hr नेली आणि त्याचे स्टीयरिंग सोडून दिले. कारण तिचा देवावर विश्वास होता आणि यासाठी तिला बघायचे होते की, देव तिची मदत करतो की, नाही.

ही घटना नक्की कुठली हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु सीसीटीव्हीमध्ये हे दृष्य कैद झालं आहे. यामध्ये एका 31 वर्षीय महिलेने तिच्या मुर्खपणामुळे स्वत: चा आणि आपल्या मुलीचा जीव धोक्यात घातला.

खरंतर, या महिलेने गाडी चालवताना कारचे स्टीयरिंग सोडले, कारण तिला देवावरील तिचा विश्वास बघायचा होता. परंतु तिच्या या मुर्खपणामुळे तिची गाडी दुसर्‍या एका कारला धडकली.

एका वृत्तानुसार, ही महिला 190 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होती, जेव्हा तिच्या कारने दुसऱ्या कारला धडक दिली. रोडवर कारला धडक दिल्यानंतर तिची कार पलटी झाली आणि विजेच्या खांब्याला जाऊन धडकली.

या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण FOX8 ने हा व्हिडीओ जारी केला आहे.

या अपघातानंतर असे आढळले की, हा अपघात चालकाच्या दुर्लक्षामुळे झाला नाही, तर जे काही घडले ते कार चालकाच्या मूर्खपणामुळे झालं होतं.

अपघातानंतर आई आणि मुलीला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु इतका गाडीचा स्पीड असूनही नशीबाने त्या दोघांनाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यानंतर आता तिच्यावर बेजबाबदार वाहन चालवणे, लहान मुलीचे आयुष्य धोक्यात घालणे आणि निलंबनाखाली वाहन चालविणे असे आरोप लावले गेले आहेत.

Read More