India-UK Trade Free Trade Agreement : भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये एक ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटन दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान मोदी आणि ब्रिटिश पंतप्रधान Keir Starmer दोन्ही देशांमधील मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळणार आहे. या करारामुळे सामान्य माणसाला अनेक गोष्टी आता स्वस्त मिळणार आहे. भारत आणि ब्रिटनमध्ये झालेल्या या मुक्त व्यापार कराराला FTA असं म्हटलं जातं. भारत-ब्रिटन मुक्त व्यापार करार (FTA) मुळे २०३० पर्यंत दोन्ही अर्थव्यवस्थांमधील व्यापार दुप्पट होऊन तो 120 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्यास मदत होईल.
जेव्हा दोन देशांमध्ये व्यापारी करतात त्यामध्ये आयात निर्यातीत काही कर लागतात. त्या कराराला व्यापारी भाषेत टॅरिफ्स म्हणतात. तर FTA म्हणजे फ्री ट्रेड अॅग्रीमेंट असं म्हटलं जातं. फ्री ट्रेड अॅग्रीमेंटमुळे टॅरिफ्स कमी होण्यास तर कधीकधी पूर्णपणे हटवलं जातं. यामुळे माल हे स्वस्त होतो आणि सर्वसामान्यांना तो कमी कमी किंमतीत मिळतो.
तसंच UK मधून औषधे आयात केली जातात आणि निर्यातही केली जातात. अशा परिस्थितीत, दोन्ही देश त्यावरचे शुल्क कमी करू शकतात, ज्यामुळे औषधे महाग आणि स्वस्त देखील होऊ शकतात. कृषी उत्पादनांच्या किमती स्थिर राहू शकतात, कारण भारताने त्यांच्या कृषी क्षेत्राशी तडजोड केलेली नाही. कार आणि बाईक सारख्या ऑटो उत्पादनांच्या किमती महाग होऊ शकतात, कारण स्पर्धा आणि टॅरिफमध्ये बदल होईल. भारत UK साठी स्टील आणि धातूच्या बाबतीत बाजारपेठ देखील खुली करेल, ज्यामुळे ब्रिटनच्या उच्च दर्जाच्या उत्पादनांशी स्पर्धा होईल. अशा परिस्थितीत, वस्तू महाग होऊ शकतात.
यूकेमधून भारतात येणाऱ्या स्कॉच व्हिस्की आणि लक्झरी कार स्वस्त होतील. भारताने पुढील 10 वर्षांत स्कॉच व्हिस्की आणि जिनवरील शुल्क 150% वरून 75 टक्के आणि पुढे 40% कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. तसंच भारत सौंदर्य प्रसाधने, सॅल्मन, चॉकलेट्स, वैद्यकीय उपकरणे आणि बिस्किटे यासारख्या उत्पादनांवरील शुल्क देखील काढून टाकेल किंवा कमी करेल.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आणि त्यांचे ब्रिटिश समकक्ष जोनाथन रेनॉल्ड्स या करारावर स्वाक्षरी करणार आहेत. आता स्वाक्षरी केल्यानंतर त्याची अंमलबाजावणी होण्यासाठी किमान एक वर्षांचा कालावधी लागणार आहे. कारण या करारावर ब्रिटिश संसदेची मंजुरी गरजेची आहे.