Marathi News> विश्व
Advertisement

नवरीने लग्नपत्रिकेवर छापली Porn वेबसाइट लिंक; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

सध्या सोशल मीडियावर एक लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे.

नवरीने लग्नपत्रिकेवर छापली Porn वेबसाइट लिंक; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : जोडप्याच्या लग्नासाठी वधू-वरांसह संपूर्ण कुटुंब लग्नाच्या तयारीत गुंततात. या दरम्यान काही चुकाही होत राहतात. लग्नपत्रिकेच्या छपाईमध्ये चुका होणं हे अगदी सर्रास घडतं. कधी नावाचं स्पेलिंग चुकचं तर कधी पत्ता चुकीचा छापला जातो. अशीच सध्या सोशल मीडियावर एक लग्नाची पत्रिका चांगलीच व्हायरल होत आहे.

तुम्ही म्हणाल आता व्हायरल होण्यासारखी यामध्ये काय चूक झाली. या लग्नपत्रिकेत किरकोळ चूक नसून ही चूक पाहून वधू-वरांचे कुटुंबीय आणि नातेवाईकही खजील झाले. वधूतर्फे ही चूक झाली असून तिने स्वतः शेअर केलीये.

Tik Tok वर @Squidward.Tentacles अकाऊंट चालवणार्‍या वधूने तिच्या लग्नाच्या कार्डासह केलेल्या चुकीबद्दल सांगितलं. तिने व्हिडिओमध्ये सांगितलं की, तिने तिच्या लग्नाच्या कार्डवर व्हेन्यूऐवजी पॉर्नहबची लिंक टाकण्याची चूक कशी केली. 

व्हिडिओमध्ये ती म्हणते, "मला मेलमध्ये माझ्या लग्नाचं आमंत्रण मिळालं, अतिशय रोमांचक. पण यात माझी एक मोठी चूक झाली आहे, जी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून इतर नववधूंनी अशी चूक करू नये. कारण मला खात्री आहे की, ही एक सामान्य चूक आहे.'

पॉर्न साइटची लिंक टाकली

लग्नसोहळ्याची योग्य URL मिळाली नाही यासाठी तिने प्लेसहोल्डर म्हणून एका वेबसाइटची लिंक वापरली. पण छापताना ही लिंक ती काढायला विसरले. कार्डवर लिहिले आहे, 'लग्नाच्या अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या www.p****ub.com वेबसाइटला भेट द्या'. अशा चुकीबद्दल वधूने तिच्या आई आणि कुटुंबीयांची माफी मागितली आहे.

Read More