Marathi News> विश्व
Advertisement

नवऱ्याच्या Best Friendवर जडला बायकोचा जीव... तिघांच्या आयुष्यानं घेतलं आश्चर्यकारक वळण

नवरा बायकोचं नातं सुरळीत सुरू होतं. पण नंतर बायकोच्या एका खुलास्यानंतर त्यांच संपूर्ण आयुष्य बदललं.

नवऱ्याच्या Best Friendवर जडला बायकोचा जीव... तिघांच्या आयुष्यानं घेतलं आश्चर्यकारक वळण

अमेरिका (सिएट) : असे म्हटले जाते की, पती-पत्नीमधील नाते 7 जन्माचे असते आणि त्यात कोणी तिसरा येऊ शकत नाही. परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका विचित्र नात्याबद्दल सांगणार आहोत. जे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तुम्ही म्हणाल की, हे कसं शक्य आहे? नवरा बायकोच्या नात्यात हा असा ट्वीस्ट कसा? आणि हे नातं कसं काय हे लोकं सांभाळत असतील?

ही घटना अमेरिकेच्या सिएटल शहरातील आहे, इथे नवरा बायकोचं नातं सुरळीत सुरू होतं. पण नंतर बायकोच्या एका खुलास्यानंतर त्यांच संपूर्ण आयुष्य बदललं.

खरे सांगाचे झाले तर या महिलेला तिच्या नवऱ्याच्या बेस्ट फ्रेंडवर प्रेम होतं आणि ही फ्रेंड म्हणजे एक मुलगी आहे. या महिलेनं आपल्या नवऱ्याला सांगितलं की, ती बायसेक्शुअल आहे आणि तिला ते एक्सप्लोर करायचे आहे. त्यामुळे तिला तिच्या नवऱ्याच्या बेस्ट फ्रेंडशी प्रेम झालं आहे.

या दाम्पत्याची लव्ह स्टोरी कॉलेजमध्ये सुरू झाली. नवरा जस्टिन हा व्यवसायाने विनोदी कलाकार आहे. एका कॉमेडी शो दरम्यान 2006 मध्ये तो रिअल इस्टेट सहयोगी कॅटी रुप्पलला भेटला असल्याचे त्याने सांगितले. ही भेट प्रेमामध्ये बदलली. त्या नंतर त्यांनी बरेच वर्ष एकमेकांना डेट केलं.

जस्टिन आणि कॅटी रुप्पल यांचे त्यांच्या पहिल्या भेटीनंतर सुमारे 7 वर्षांनंतर वर्ष 2013 मध्ये लग्न झाले. पण लग्नानंतर लगेचच कॅटीने आपल्या नवऱ्याला सांगितले की ती बायसेक्शुअल आहे.

fallbacks

आपल्या पत्नीच्या या वक्तव्यामुळे जस्टिन आश्चर्यचकित झाला. त्यानंतर सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा कॅटीने हे उघड केले की, तिचे ज्या व्यक्तीवर प्रेम करते ती जस्टीनची सर्वात चांगली मित्रीण क्लेअर आहे.

कॅटीने सांगितले की, तिने क्लेअरला तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहिले आणि ती तिच्याकडे आकर्षित झाली

यानंतर जस्टिन क्लेअरशी बोलतो आणि सांगतो की कॅटीला ती आवडते. तेव्हा क्लेअर प्रथम आश्चर्यचकित होते, परंतु तिला आधीच मुलगा आणि मुली दोघांमध्ये रस होता, म्हणून ती एकत्र राहण्याची तयारी दर्शवते. त्यानंतर आता जस्टिन, कॅटी आणि क्लेअर आता एकत्र कुटूंबात (Throuple) रहातात.

fallbacks

या तिघांना त्यांच्या नात्याबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की, संबंध चांगले रहाण्यासाठी टीमवर्क आणि कम्युनीकेशन चांगले असणे गरजेचे आहे. त्यात जर त्यांच्यापैकी कोणामध्येही इर्शा उत्पादन झाली तर, ते आपापसात बसून चर्चा करतात. या कारणामुळे हे तिघे ही विना कोणत्याही वादा शिवाय चांगले आयुष्य जगत आहेत.

Read More