Marathi News> विश्व
Advertisement

लग्नाच्या दिवशी गायब झाली महिला, ४ दिवसानंतर अशा स्थितीत सापडली

लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी महिलेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला होता.

लग्नाच्या दिवशी गायब झाली महिला, ४ दिवसानंतर अशा स्थितीत सापडली

मुंबई : विवाह हा अत्यंत पवित्र मानला जातो. चांगला जोडीदार मिळाला तर माणसाचे आयुष्य चांगले बनते. दुसरीकडे, चुकीचा जोडीदार मिळाल्याने तुमचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. असेच एक प्रकरण ब्रिटनमधून समोर आले आहे, जिथे एका 52 वर्षीय महिलेने या वयातही मोठ्या स्वप्नांसह लग्न केले, परंतु हे लग्न तिच्या मृत्यूचे कारण बनेल असे तिला वाटले नव्हते. लग्नानंतर अवघ्या चार दिवसांनी महिलेचा मृतदेह एका सुटकेसमध्ये सापडला होता.

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, ब्रिटनमधील 52 वर्षीय डॉन वॉकरने (Dawn Walker) गेल्या बुधवारी थॉमस नट (Thomas Nutt) नावाच्या 45 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न केले. लग्नानंतर चार दिवसांनी डॉन वॉकरचा मृतदेह वेस्ट यॉर्क, हॅलिफॅक्सच्या परिसरात झुडपात सापडला होता. हा परिसर वॉकरच्या घराजवळ आहे. या प्रकरणी तिचा पती थॉमस याच्यावर खुनाचा आरोप आहे. महिलेचा गळा आवळून खून झाल्याचा संशय आहे.

महिलेच्या घराजवळून घाणेरडा वास येत होता. त्यानंतर त्या ठिकाणी एक सुटकेस आढळली. शंका आल्याने लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तपासासाठी पाठवला आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

वॉकरचा अशाप्रकारे खून झाल्याने तिचे नातेवाईक आणि मित्रांनाही धक्का बसला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, वॉकर आणि थॉमस अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि दोघांनी जानेवारी 2020 मध्ये एंगेजमेंट केली. दोघांनीही आपले लग्न संस्मरणीय बनवण्यासाठी अनेक महिने प्लॅनिंग केले होते. अखेर गेल्या बुधवारी दोघांचे लग्न झाले. त्याच गोष्टी त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना खटकत आहेत की त्यांच्यात काय घडले ज्यामुळे वॉकरचा खून झाला.

त्यांच्या लग्नाला आलेल्या एका पाहुण्याने सांगितले की ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करतात. वॉकरच्या एका मित्राचे म्हणणे आहे की ती सर्वांत चांगली होती. 49 वर्षीय लिसा वॉकर,  म्हणाली माझी बहिण खूप छान होती. असे का घडले? डॉन वॉकरला आधीच्या पतीपासून 2 मुले होती.

Read More