Marathi News> विश्व
Advertisement

इतके मोठे पोट बघून महिलेला वाटले दोन मुलं असतील, डिलिव्हरीनंतर सगळेच झाले चकीत...

 अशी एक घटना घडली आहे की, सगळेच आश्चर्यचकीत झालेत. एका महिलेला आपले मोठे पोट बघून वाटले दोन मुलं असतील. मात्र, डिलिव्हरीनंतर तीही चकीत झाली. 

इतके मोठे पोट बघून महिलेला वाटले दोन मुलं असतील, डिलिव्हरीनंतर सगळेच झाले चकीत...

मुंबई : यूकेमध्ये अशी एक घटना घडली आहे की, सगळेच आश्चर्यचकीत झालेत. एका महिलेला आपले मोठे पोट बघून वाटले दोन मुलं असतील. मात्र, डिलिव्हरीनंतर तीही चकीत झाली. तिने चक्क 5.15 किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला. ही घटना ब्रिटनमधील आहे.

ब्रिटनमधील (Britain) एका महिलेने 5.15 किलो वजनाच्या मुलाला जन्म दिला आणि एक विक्रम केला आहे. गर्भधारणेदरम्यान, 33 वर्षीय महिलेचे पोट इतके मोठे होते की तिला जुळे जन्मण्याची अपेक्षा होती, परंतु मुलाच्या जन्मानंतर सर्वांना आश्चर्य वाटले.

fallbacks

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार, आजपर्यंत जन्मलेल्या सर्वात वजनदार मुलाचा जन्म 19 जानेवारी 1879 रोजी ओहियोच्या सेव्हिल येथे झाला. त्याचे वजन 22 एलबी म्हणजे 9.98 किलोग्रॅम. त्याची लांबी 71.12 सेंटीमीटर म्हणजेच सुमारे 28 इंच होती. दरम्यान, जन्मानंतर 11 तासात हे बाळ दगावले. (फोटो स्रोत - डेलीमेल)

fallbacks

डेलीमेलच्या वृत्तानुसार, यूकेच्या वॉर्स्टरशायर येथे राहणा 33 वर्षीय जेड बायरचे (Jade Bayer) गरोदरपणात इतके पोट मोठे होते की तिला असे वाटत होते आपल्याला जुळे होतील. कारण यापूर्वी मी जुळ्या मुलांना जन्म दिला होता. दरम्यान, तिने जेव्हा फक्त एका मुलास जन्म दिला. (फोटो स्रोत - डेलीमेल)

fallbacks

अहवालानुसार, जेड बायरने (Jade Bayer) 5 एप्रिल रोजी वॉर्सरशायर रॉयल हॉस्पिटलमध्ये मुलगा रॉनी-जे फ्यूट्रेल याचा जन्म झाला. त्याचे वजन सुमारे 5.15 किलो होते. बायरशिवाय डॉक्टरही मुलाला पाहून आश्चर्यचकित झाले. (फोटो स्रोत - डेलीमेल)

fallbacks

जेड बेयर (Jade Bayer) म्हणाली, 'तिचा मुलगा रॉनी-जे फ्यूट्रेल इतका मोठा आहे की तो नवजात मुलांच्या कपड्यांमध्ये फिट बसत नाही. जन्माच्या वेळी, तो तीन ते सहा महिन्यांच्या मुलासारख्या पोशाखात दिसत होता. (फोटो स्रोत - डेलीमेल)

fallbacks

सध्या बाळ आणि त्याची आई जेड बायर दोघेही ठठणीत आहेत. जेड बेयर म्हणाली, 'मी पूर्ण 16 तास प्रसूतिगृहात होती आणि त्याच्या आकारामुळे आपण कल्पना करू शकतो की तो खरोखर अडकला होता. यानंतर मला सी-सेक्शन हवा होता. कारण मी खूप दिवस मजेत होते आणि मी खूप थकले होते. यानंतर डॉक्टरांनी एपिड्युरल ट्राय करण्यास सांगितले? त्यानंतर मी ते केले आणि सुमारे अर्ध्या तासानंतर रॉनीचा जन्म झाला. (फोटो स्रोत - डेलीमेल)

Read More