Marathi News> विश्व
Advertisement

ख्रिसमसचं गिफ्ट आणि सुजले ओठ...हालत पाहून घरचे टेंशनमध्ये

World Biggest Lips Women : ख्रिसमस हा सण प्रत्येकजण अतिशय वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो. एका महिलेने स्वतःलाच मोठे ओठ देऊन नाताळ हा सण साजरा केलाय. पण तिचा पुढील प्लान अतिशय धक्कादायक

ख्रिसमसचं गिफ्ट आणि सुजले ओठ...हालत पाहून घरचे टेंशनमध्ये

आजकाल सुंदर दिसण्यासाठी लोक कोणत्याही थराला जायला तयार असतात. यासोबतच आपल्यामध्ये असे काही लोक आहेत जे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे करण्यासाठी नवनवीन प्रयोग करत असतात. आता बल्गेरियातील एका महिलेने असेच काहीस केलंय. तिचे नाव एंड्रिया इव्हानोव्हा आहे आणि ती जगातील सर्वात मोठी ओठ असलेली महिला म्हणून ओळखली जाते.

अँड्रिया इव्हानोव्हा दरवर्षी ख्रिसमसच्या निमित्ताने तिच्या ओठांमध्ये फिलर्स लावते. अशा परिस्थितीत यंदाही इवानोव्हाने ख्रिसमस गिफ्ट म्हणून स्वत:साठी लिप फिलर्स खरेदी केले आहेत. द मिररच्या रिपोर्टनुसार, या बल्गेरियन महिलेने आतापर्यंत तिच्या ओठांवर वीस लाख रुपये खर्च केले आहेत. पण आता या महिलेला जगातील सर्वात मोठे गाल असलेली महिला बनायचे आहे.

पाहा फोटो

इव्हानोव्हाचे कुटुंब चिंतेत

इव्हानोव्हाने कबूल केले की, तिची ही शारीरिक परिस्थिती पाहून तिचे मित्र आणि कुटुंबीय आता तिच्या आरोग्याबद्दल काळजीत आहेत. तिने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे की, माझ्या कुटुंबांना आणि जवळच्यांना वाटते की, माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल आणि या गोष्टींचे भविष्यात मला घातक परिणाम भोगावे लागतील. ती पुढे म्हणाली, "मला माहित आहे की त्यांना माझा बदल आवडत नाही, त्यांना वाटते की, मी खूप विचित्र, वाईट दिसते, परंतु मला स्वतःला खूप आवडते.

चेहरा, गाल हवेत मोठे

इव्हानोव्हाने सांगितले की, यावेळी जेव्हा ती ख्रिसमससाठी तिच्या घरी फिलर टाकून गेली तेव्हा तिला पाहून घरातील लोक घाबरले. इव्हानोव्हा म्हणाली की पुढील वर्षी तिचा चेहरा अधिक फिलर्सने वाढवण्याची तिची योजना आहे. ती म्हणाली, "मी आता मोठी आहे आणि मला माझ्या शरीराचे काय करायचे आहे हे माहित आहे. दरवर्षी मी माझ्यासाठी नवीन फिलर्सची भेटवस्तू बनवते." 26 वर्षीय इव्हानोव्हा म्हणाली, "मला अशा व्यक्तीसोबत आनंदाने राहायला आवडेल. ज्याला माझ्यासोबत राहायला किंवा फिरायला आवडेल. त्याला कोणतीही लाज वाटणार नाही. 

Read More