Marathi News> विश्व
Advertisement

पंतप्रधान मोदींच्या भाषणाने जागतिक आर्थिक संमेलनाला सुरुवात

वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वित्झरलँडमधील दावोसमध्ये आहेत.

पंतप्रधान मोदींच्या भाषणाने जागतिक आर्थिक संमेलनाला सुरुवात

दावोस : वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान मोदी स्वित्झरलँडमधील दावोसमध्ये आहेत.

पीएम मोदींच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे.  जागतिक आर्थिक मंचाच्या 48व्या संमेलनाचं उद्घाटन पीएम मोदींच्या भाषणाने झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दशकांमध्ये दावोस संमेलनात भाग घेणार पहिले पंतप्रधान आहे.

जागतिक आर्थिक संमेलनात 2000 हूऩ अधिक कंपन्यांचे सीईओ उपस्थित आहेत. 21 वर्षानंतर कोणते भारतीय पंतप्रधान या संमेलानाला संबोधित करत आहे. जागतिक आर्थिक संमेलनाला पंतप्रधान मोदी हिंदीमध्ये संबोधित करत आहे.

आपला विकास झाला का हा आपल्याला विचार करावा लागेल. भारत आधीपासून जोडण्याचं काम करत आहे. 21 व्या शतकात विकासाने काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. वसुधैव कुटुंबकम भारताची खरी ताकद आहे. असं यावेळी पंतप्रधानांनी म्हटलं.

Read More