Marathi News> विश्व
Advertisement

PHOTO : मुलीला 'स्तनपान' करवणारा जगातील पहिलाच बाप

न्यूब्यूरचा नवजात मुलीला स्तनपान करवताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय

PHOTO : मुलीला 'स्तनपान' करवणारा जगातील पहिलाच बाप

नवी दिल्ली : एक बाप आपल्या मुलीसाठी काय करू शकतो? या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काहीही... हो काहीही, अगदी स्तनपानही... याचंच ताजं उदाहरण अमेरिकेच्या विस्कोन्सिनमध्ये पाहायला मिळालं. मॅक्समिलन न्यू्ब्यूर जगातील पहिला बाप बनलाय ज्यानं आपल्या मुलीला 'स्तनपान' करवलं... आणि त्याची मुलगी रोजेली जगातील पहिली मुलगी आहे जिनं आपल्या आईकडून नाही तर वडिलांकडून 'स्तनपान' घेतलंय. मॅक्समिलन न्यूब्यूरचा नवजात मुलीला स्तनपान करवताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या अनोख्या गोष्टीसाठी मॅक्समिलननं एका छोट्या युक्तीचा वापर केलाय.

मॅक्समिलनच्या पत्नीनं एका मुलीला जन्म दिला... परंतु, तिची डिलिव्हरी मात्र सामान्य झाली नाही. ब्लड-प्रेशर वाढल्यानं २६ जून २०१८ रोजी तिची सिझेरियन पद्धतीनं डिलीव्हरी झाली. अशा वेळी तिला आपल्या मुलीला स्तनपान करवणं अशक्य होतं... त्यामुळे नर्सनं आणि मॅक्समिलननं एक युक्ती शोधून काढली. नर्सनं मॅक्समिलनच्या छातीवर एक कृत्रिम निप्पल लावला... एका ट्यूबच्या मदतीनं प्लास्टिक निप्पल मॅक्समिलनच्या छातीला चिपकवण्यात आला. ही ट्यूब दुधानं भरलेल्या एका सीरिंजशी जोडला गेला होता... आणि अशा पद्धतीनं नवजात मुलीला एका पित्याकडून स्तनपान करवण्यात आलं. 

मॅक्समिलननं आपला हा अनुभव फेसबुकवर शेअर केलाय. त्याचा हा फोटो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झालाय. 

Read More