China Cable Cutter: सागरी किनारपट्टी लाभलेल्या प्रत्येक देशाची सागरी सीमा निर्धारित असली तरीही चीन मात्र सध्या जगभरातील देशांसाठी अथांग समुद्रामध्ये खोलवर एक धोक्याचं पाऊल उचलताना दिसत आहे. लक्षवेधी वृत्तानुसार चीनकडून एक असं उपकरण तयार करण्यात आलं आहे, ज्यामुळं समुद्राच्या प्रचंड खोलवरील अंतरावर असणाख्या ‘अंडर सी केबल’सुद्धा कापता येतील.
‘चायना शिप सायंटिफिक रिसर्च सेंटर अँड लॅबोरेटरी ऑफ डीप सी मॅन्ड व्हीकल्स’नं मिळून हे उपकरण तयार केलं असून, जागतिक स्तरावर पहिल्यांदाच कोणा एका देशानं हे उपकरण तयार करण्यासंदर्भात अधिकृत घोषणा केली आहे. चीनचं हे उपकरण जगभरातील विविध संचार आणि सैन्य अभियानांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या Undersea Cables वर निशाणा साधू शकतं.
लक्षात घेण्याजोगी बाब अशी, की या त्याच केबल आहेत ज्यांच्या माध्यमातून जगातील 95 टक्के डेटा एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी एका क्षणात पाठवता येतो. महाद्वीपांना जोडण्याशिवाय या केबलच्या माध्यमातून Money Market, संरक्षण यंत्रणा आणि दैनंदिन डिजिटल सेवा सुरळीत ठेवण्याचं काम होतं.
चीनच्या उपकरणाचा जागतिक स्तरावर असणारा धोका ओळखणं अतिशय महत्त्वाचं. कारण समुद्रात असणाऱ्या या केबल कापण्याचं धाडस चीननं केलं तर, अनेक अडचणींचा सामना संपूर्ण जगाला करावा लागू शकतो. इंडिनिअर हू हाओलोंग यांच्या टीनं हे खास उपकरण तयार केलं असून त्यात 6 इंचांची हीरा ग्राईंडींग व्हील लावण्यात आली आहे, जी 1600 RPM च्या वेगानं फिरते. या मशीनमधून इतकी ताकद निर्माण होते की या गतीनं स्टीलच्या जाड तारासुद्धा कापल्या जाऊ शकतात. या उपकरणाची सक्रियता समुद्रात असताना कोणाच्याही लक्षात येत नाही ही त्याची जमेची बाजू.
चीन या केबल कटर उपकरणासह अशा वेळी जगापुढं उभं ठाकलं आहे जेव्हा सागरी खोलीवर असणाऱ्या अनेक देशांच्या केबल धोक्यात आहेत. बाल्टीक समुद्रामध्ये 2023 पासून आतापर्यंत 11 वेळा या तारांना नुकसान पोहोचवण्यात आलं होतं. आणि आता त्याची शक्यता आणखी वाढल्याचं म्हटलं जात आहे. बिजिंग स्वत:ला एक मोठी सागरी ताकद म्हणून जगापुढं ठेवत असतानाच चीनचं हे उपकरयण एका मोठ्या सागरी युद्धाची सूचना तर नाही ना, हाच चिंतेचा प्रश्न उपस्थित करुन जात आहे.