Marathi News> विश्व
Advertisement

थट्टा नाही, हे खरंय! 'या' 5 ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना 100 वर्षं आयुष्याचं वरदान; Location पाहाच

World Travel News : पृथ्वीवर काही अशी कमाल ठिकाणं आहेत, ज्यांच्यासंदर्भातील माहिती कायमच थक्क करत असते. अशाच ठिकाणांविषयी जाणून घ्या...   

थट्टा नाही, हे खरंय! 'या' 5 ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना 100 वर्षं आयुष्याचं वरदान; Location पाहाच

World Travel News : जाणून आश्चर्य वाटेल, पण पृथ्वीवर आजही अशी 5 ठिकाणं अस्तित्वात आहेत जिथं माणसांचं आयुर्मान हे सरासरी 100 वर्षे इतकं आहे. मुळात हा थट्टेचा विषय नसून, अनेकांसाठी कुतूहल आणि अभ्यासाचा विषय आहे. 2004 मध्ये Gianni Pesce आणि Michael Pollan या अभ्यासकांनी इटलीमधील सार्डिनिया या ठिकाणाचा शोध लावला. 

असं म्हटलं जातं की, इथं वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचं सरासरी वय 100 वर्षे असून असं इतर ठिकाणी फारच क्वचित होतं. या संशोधनानंतर Dan Buettner कडून पृथ्वीवरील 'ब्लू झोन' म्हणवल्या जाणाऱ्या या ठिकाणांच्या यादीत चार आणखी ठिकाणं जोडलं. जिथं वास्तव्यास असणाऱ्यांसोबत सार्डिनियाच्या नागरिकांचं साधर्म्य आढळलं. येथील नागरिकांना जीवनशैलीशी संबंधित कोणतंही आजारपण नाही आणि तेसुद्धा सहजपणे वयाची शंभरी गाठतात. 

संशोधकांच्या माहितीनुसार ग्रीसमधील  Ikaria, इटलीतील सार्डिनिया, जपानमधील ओकिनावा, अमेरिकेतील लोमा लिंडा आणि कोस्टा रिकातील नायायो या ठिकाणांना 'ब्लू झोन'मध्ये गणलं जातं. या यादीमध्ये आता सिंगापूरचासुद्धा समावेश झाला असून, मागील 10 वर्षांमध्ये सिंगापूरमध्ये शंभरी गाठणाऱ्यांचा आकडा दुपटीनं वाढल्याचं म्हटलं जात असून 2010 ते 2020 दरम्यानची आकडेवारी यासाठी ग्राह्य धरण्यात आली. 

हेसुद्धा वाचा : धक्कादायक! बटाटावडा विक्रेत्यांकडून...; लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ 

Blue Zone ही संकल्पना नॅशनल जिओग्राफिकचे पत्रकार Dan Buettner यांनी शोधली असून, यामध्ये पृथ्वीवरील अशा ठिकाणांचा समावेश करण्यात येतो जिथं नागरिक संस्कृती, जीवनशैली, आहार आणि सामाजिक स्तरावर दीर्घायुषी राहतात. 

शास्त्रज्ञांचं निरीक्षण Blue Zone बाबत काय सांगतं? 

शास्त्रज्ञांच्या निरीक्षणानुसार मानवी जनुकं आरोग्यदायी जीवनशैलीमध्ये 20 ते 30 टक्के योगदान देतात. याशिवाय पर्यावरण, अन्न, जीवनशैली हे घटकसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. ज्यामुळं ब्लू झोनमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांचं आयुर्मान अधिक असतं. इथले रहिवासी अतिशय साधं राहणीमान कायम जपतात. बहुतांशी ते शाकाहारी असतात, त्यांच्या आहारात 95 टक्के पदार्थ हे भाजीपाल्याशी संबंधित असतात. कोणत्याही प्रकारच्या भेसळीपासून ही मंडळी दूर राहत आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहतात. 

Read More