World Smallest Country: 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. हा दिवस पवित्र सणांपैकी एक मानला जातो. जिथे महादेवाचे सारे भक्त संपूर्ण दिवस भगवान शिवाच्या भक्तीत तल्लीन झालेले दिसतात. या दिवशी भगवान शिव यांची विशेष पूजा केली जाते. पण भारताव्यतिरिक्त जगात असा एक देश आहे जिथे लोक भगवान शिवाचे इतके मोठे भक्त आहेत. तुम्हाला या देशाच्या आकारावरुन शिवलिंगाची आठवण नक्की येईल. विशेष म्हणजे हा देश लोकसंख्येच्या बाबतीतही इतका लहान आहे, ज्यात भारतातील संपूर्ण गाव मावेल.
या देशाचा आकार शिवलिंगासारखा देण्यात आला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे संपूर्ण देश फक्त 0.44 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेला आहे. त्यामुळे जगातील सर्वात लहान मान्यताप्राप्त देश म्हणून याची ओळख आहे. व्हॅटिकन सिटी असे या देशाचे नाव असून तो युरोपमधील रोममध्ये आहे. या देशाची लोकसंख्या इतकी कमी आहे की ती भारतातील एका गावात बसू शकते. या छोट्याशा देशात साधारण ८०० लोकं राहतात. व्हॅटिकन सिटीशी संबंधित माहिती नसलेल्या गोष्टी जाणून घेऊया.
जगातील छोट्या देशांमध्ये गणल्या जाणाऱ्या या देशाला शिवलिंगाचा आकार का दिला गेला असेल? असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. याचे उत्तरही तितकेच रोमांचकारी आहे. अनेक शतकांपूर्वी येथे उत्खननादरम्यान एक प्राचीन शिवलिंग सापडले होते. या कारणास्तव संपूर्ण देश शिवलिंगाच्या आकारात वसवला गेला आहे. एका इतिहासकारानेही त्यांच्या संशोधनात या घटनेला दुजोरा दिला आहे. जर तुम्ही वरून व्हॅटिकन सिटीकडे पाहिले तर त्याचा आकार अगदी शिवलिंगासारखा दिसेल. एवढेच नव्हे तर भगवान शिवाच्या कपाळावर तीन रेषा देखील तुम्हाला यात दिसतात. इटलीतील रोम येथे असलेल्या या देशाच्या लोकांमध्ये यासंदर्भात श्रद्धा असल्याचे म्हटले जाते.
उत्खननादरम्यान सापडलेले शिवलिंग अजूनही व्हॅटिकन सिटीमधील ग्रेगोरियन एट्रस्कन संग्रहालयात असल्याचे म्हटले जाते. हे पाहण्यासाठी पर्यटक दूरदूरहून येथे येतात. या देशाच्या नावाचा भारताशीही संबंध असल्याचे म्हटले जाते. व्हॅटिकन हा शब्द संस्कृत शब्द वाटिका पासून आल्याचे सांगितले जाते.
गेल्या काही वर्षांमध्ये जग वेगाने बदलले आहे. असे असले तरी शतकानुशतके सुरु असलेल्या जुन्या परंपरा अजूनही या देशात पाळल्या जातात. येथे इटालियन ही प्रमुख भाषा बोलली जाते. विकासाच्या बाबतीतही हा देश इतर देशांच्या तुलनेत खूपच मागे आहे. येथे कोणत्याही प्रकारची सार्वजनिक वाहतूक नाही.
व्हॅटिकन सिटीमध्ये 300 मीटर लांबीचा रेल्वे मार्ग आहे. ज्याचा उपयोग माल वाहतूक करण्यासाठी केला जातो. या देशात आरोग्यासंदर्भात कोणती जागृकता दिसून येत नाही. कारण इथे एकही रुग्णालय तुम्हाला दिसणार नाही. ज्या देशात व्यक्ती जन्म तिथले नागरिकत्व त्यांना मिळते पण व्हॅटिकन सिटी याला अपवाद आहे. येथे लोकांना जन्माच्या आधारावर नागरिकत्व दिले जात नाही. पण त्यांना येथे काम करावे लागते. नोकरी सोडल्यानंतर तुमचे येथील नागरिकत्वही संपते. या ठिकाणाचे स्वतःचे वेगळे चलन असल्याचेही सांगितले जाते.