Marathi News> विश्व
Advertisement

Report : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल

X आणि Y या दोन क्रोमोझोनमुळे लिंग ठरतो. एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, Y गुणसुत्र जे मुलांना मुलींपेक्षा वेगळे अधोरेखित करतात. ते हळू हळू लुप्त होत चालले आहेत. यामुळे भविष्यात पुरुष कायमचे नष्ट होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. 

Report : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल

एका संशोधनात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. Y क्रोमोझोन झपाट्याने कमी होत आहे. अशावेळी जेनेटिक बदल झाले तर काय होईल? असा प्रश्न अगदी सहज पडू शकतो. संशोधकांना भीती आहे की, मनुष्य जातीच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून हा सर्वात मोठा धोका आहे. नेमकं यामागचं कारण काय? 

 X आणि Y क्रोमोझोन कसे कार्य करतात?

आपण सुरुवातीला X आणि Y क्रोमोझोनबद्दल जाणून घेऊया. स्त्रीच्या शरीरात दोन X क्रोमोझोन म्हणजे गुणसूत्र असतात. तर पुरुषांमध्ये एक X क्रोमोझोन तर दुसरा Y क्रोमोझोन असतात. जेव्हा स्त्रीच्या गर्भाशयात X आणि Y हे गुणसूत्र येतात तेव्हा मुलगा जन्माला येतो. आणि जेव्हा गर्भात XX गुणसुत्रे एकत्र येतात तेव्हा मुलीचा जन्म होतो. मात्र आता Y गुणसुत्र नष्ट होत चालल्याच संशोधनात सांगितलं आहे. यामुळे पुरुष प्रजाती आणि कालांतराने पर्यायाने मानवजात नष्ट होणार असल्याचं म्हटलं जातं. 

Y क्रोमोझोनवर व्यक्त केली चिंता 

मानव आणि प्लॅटिपस वेगळे झाल्यापासून 166 दशलक्ष वर्षांत, Y गुणसूत्राने मोठ्या संख्येने सक्रिय जीन्स गमावले आहेत. आता 900 वरून फक्त 55 पर्यंत Y गुणसुत्र असल्याचं सांगण्यात येत आहे. हा कल असाच सुरू राहिल्यास, Y गुणसूत्र पुढील 11 दशलक्ष वर्षांत पूर्णपणे नाहीसे होऊ शकते. या संशोधनावरुन अशी चर्चा रंगली आहे की, Y क्रोमोझोन हळू हळू लोप होत चालली आहे. यामुळे पर्यायाने मानवजात नामशेष होईल अशी शंका वर्तवण्यात येत आहे. 

पुरुष नामशेष होणार का? 

प्रोफेसर ग्रेव्स यांचं म्हणणं आहे की, या अभ्यासात अशी माहिती मिळाली आहे की, मानवामध्ये सेक्स डिटरमिनिंग जीन विकसित झाला आहे. हे इतकं सहज सोप्पं नाही. पुढे त्यांनी म्हटलं की, तसेच या नव्या सेक्स डिटरमिनिंग जीन विकसित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. 

2022मध्ये प्रकाशित झालेल्या  प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसमधील एका शोधनिबंधामुळे नवीन जनुक विकसित होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे एका पर्यायी शक्यतेकडे निर्देश करतात आणि त्यामध्ये म्हटले आहे की, मानव एक नवीन लिंग-निर्धारित जनुक विकसित करू शकतो. पण ते इतके सरळ नाही आणि त्याचा विकास देखील अनेक धोके घेऊन येईल. म्हणजे आता त्याचा पर्याय म्हणून विचार करणे फार महत्त्वाचे आहे. 

मानवजातच पर्यायाने नामशेष होणार?

संशोधकांनी वर्तवलेल्या भीतीनुसार, Y गुणसुत्र लोप पावत चालल्यामुळे पुरुष प्रजात नामशेष होईल. यामुळे जगात फक्त महिला राहतील. पण महिला राहिल्यावर फक्त XX गुणसुत्रे असतील. Y गुणसुत्रांची कमतरता भासली तर XY यांचा मिलाप न झाल्यामुळे पर्यायाने मानव जातच नष्ट होईल. 

Read More