'हा' आवाज ऐकताच समजून जा की तुमचा फोन कॉल होतोय रेकॉर्ड
Shivraj Yadav
Oct 27, 2024
अनेक जण प्रायव्हसी मेंटेन ठेवण्यासाठी काही ट्रिक्स फॉलो करतात. पण जर एखादी व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत असेल तर कसं ओळखायचं हे जाणून घ्या.
अशाच काही सोप्या ट्रिक्सबद्दल जाणून घ्या, ज्याच्या माध्यामतून तुम्ही समोरची व्यक्ती फोन रेकॉर्ड करतंय की नाही हे जाणून घेऊ शकता.
फोन कॉलच्या आधी अनेकदा कॉल रेकॉर्डिंगबद्दल सांगितलं जातं. फोनच्या सुरुवातीला This Call May Be Recorded असा मेसेज येतो.
फोन कॉलच्या सुरुवातीला एक मोठा बीप ऐकू येतो. याचा अर्थ समोरची व्यक्ती तुमचा कॉल रेकॉर्ड करत आहे.
फोन कॉलदरम्यान तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल की, समोरुन बीप साऊंड येत आहे की नाही. फोन कॉलदरम्यान जर मधे-मधे बीप आवाज येत असेल तर तुमचा कॉल रेकॉर्ड होत आहे.
जर एखादी व्यक्ती तुमचा फोन कॉल रेकॉर्ड करत असेल तर तो भविष्यात तुमच्याविरोधात वापर करु शकतो. अशात तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं.
गुगल प्ले स्टोअरमध्ये असे अनेक अॅप उपलब्ध आहेत, जे कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देतात. पण कॉल रेकॉर्डिंगसाठी थर्ड पार्टी अॅपचा वापर करु नये असा सल्ला दिला जातो.
बनावट अॅप्सपासूनही सावधान राहण्याची गरज आहे. इंटरनेटवर असे अनेक अॅप्स आहेत जे लोकांना फसवण्याच्या उद्देशाने तयार केले जातात. हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर तुमच्या फोनमधील डेटा जाऊ शकतो.