जेवण बनवताना हात भाजल्यास काय करावं? घरगुती उपाय येतील कामी
Pooja Pawar
Jul 31, 2025
बऱ्याचदा जेवण बनवताना चटका किंवा अंगावर तेल पडल्याने त्वचा भाजते.
तेव्हा त्वचा भाजल्यास काही घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतात.
त्वचेवर भाजलेल्या ठिकाणी तुम्ही एलोवेरा जेल लावू शकता. एलोवेरा जेल हे औषधी गुणांनी युक्त असल्याने त्याने त्वचेला थंडावा मिळतो.
त्वचा भाजली की तिथे सूज येणे किंवा फोड येणे अशा समस्या होऊ शकतात. अशावेळी त्वचेवर केळ लावावं.
भाजलेल्या त्वचेवर लगेचच नारळाचं तेल लावावं, असं करणं फायदेशीर ठरतं.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणतीही गोष्ट त्वचेवर लावण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)