स्टँडअप हिंदी कलाजगतामध्ये जिथं आता स्टँडअप कॉमेडीचा ट्रेंड चर्चेत येत आहे, तिथेच एका कलाकारानं कैक वर्षांपूर्वीच आपल्या विनोदी शैलीनं प्रेक्षकांच्या मनावर ठाव घेतला आहे.
आनंद या अभिनेत्याचं, खळखळून हसवणाऱ्या आणि प्रेक्षकांना अविरत आनंद देणाऱ्या या कलाकाराचं नाव आहे जॉनी लिव्हर.
विनोदी भूमिका जेव्हाजेव्हा हिंदी कलाजगतातील एखाद्या विनोदी भूमिका साकारणाऱ्या नटाचा उल्लेख होतो तेव्हाचेव्हा जॉनी लिव्हर यांचं नाव चर्चेत असतं.
कल्पना एकाहून एक सरस आणि तितक्यात लक्षात राहणाऱ्या भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराचं खरं नाव काय आहे याची कल्पना तरी आहे?
बॉलिवूड 1984 मध्ये जॉनी लिव्हर यांनी हिंदी कलाविश्वात पदार्पण करत आपल्या सिने कारकिर्दीला सुरुवात केली होती. बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी आपलं नाव बदललं. जॉनी लिव्हर यांचं खरं नाव होतं, जॉनी राव.
वडील त्या काळात जॉनी लिव्हर यांचे वडील देशातील अग्रगणी अशा हिंदुस्तान लीवर कंपनीमध्ये नोकरी करत होते.
नक्कल वडिलांसोबत जॉनी कायमच त्यांच्या कंपनीत जात आणि तिथं नकला करून सर्वांना निखळ आनंद देत ज्यामुळं तेथील कामगारस वर्गानंच या लहान जॉनीला ही ओळख देऊ केली, ती म्हणजे जॉनी लिव्हर.