कॅश वापरण्याला प्राधान्य मात्र आजही अनेकजण कॅश वापरण्याला प्राधान्य देतात. पूर्वीप्रमाणे अगदी आजही घरात थोडी तरी कॅश हवी असं म्हणत बरीच रोख रक्कम घरात ठेवतात.
किती कॅश ठेऊ शकता याचा नियम आहे का? घरात कॅश ठेवण्यासंदर्भात आयकर विभागाचे काही नियम आहेत. तुम्ही घरात किती कॅश ठेऊ शकता आणि त्यासाठी काही अटी-शर्थी आहेत का पाहूयात...
किती कॅश ठेऊ शकतो? खरं तर घरात किती कॅश ठेवावी यावर कोणतेही कायदेशीर बंधन नाही. तुम्ही कितीही कॅश घरात ठेऊ शकता.
ठोस पुरावे गरजेचे मात्र घरामध्ये मोठ्या प्रमाणात कॅश असेल तर ती कोणत्या मार्गाने आली याचे ठोस पुरावे तुमच्याकडे हवेत.
बेहिशोबी मालमत्ता असेल तर... कॅशमधील सर्व रक्कम ही तुमच्या कायदेशीर कमाईतून आलेलं हवं. बेहिशोबी मालमत्ता असेल तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.
छापा पडतो तेव्हा तुमच्याकडे कोणती माहिती आवश्यक? आयकर विभागाचा छापा पडला तर तुमच्याकडील पैसे नेमके कुठून आले? त्याचा स्रोत काय याचा तपशील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
आयकरचा छापा कधी पडतो? आयकर विभागाकडून सामान्यपणे छापे टाकताना काही महत्त्वाच्या आर्थिक गोष्टींचा विचार केला जातो. एखाद्या खात्यामध्ये अघोषित उत्पन्न किंवा 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्ता किंवा तस्करी, फसवणूक किंवा दहशतवाद यासारख्या बेकायदेशीर गोष्टींमध्ये सहभागी असल्याचे विश्वसनीय पुरावे किंवा गुप्तचर माहिती असते तेव्हा छापेमारी केली जाते.
तुमच्याकडील रोख रक्कमेचा हिशोब तुम्हाला देता आला नाही तर तुम्हाला मोठा दंड केला जाऊ शकतो.
तुरुंगवासही होऊ शकतो दंडाची रक्कम ही सापडलेल्या बेहिशोबी मालमत्तेच्या प्रमाणात असते. काही प्रकरणांमध्ये तुरुंगवासही होऊ शकतो.