भारतातील कोणत्या राज्यात आहे आशियातलं सर्वात मोठं गाव?

Pooja Pawar
Aug 06, 2025


भारत अनेक बाबतीत देश विदेशात प्रसिद्ध आहे. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.


भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे. भारतात सध्या एकूण 28 राज्य तर 8 केंद्र शासित प्रदेश आहेत.


भारतात एकूण 797 जिल्हे असून यातील 45 जिल्हे हे केंद्र शासित प्रदेशात येतात.


देशात एकूण गावांची संख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार 6,49,481 इतकी आहे.


यापैकी तुम्हाला माहितीये का क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठं गाव कोणतं आहे?


उत्तर प्रदेशच्या गाजीपूर जिल्ह्यातील 'गहमर' हे भारतातील सर्वात मोठं गाव आहे.


गमहर हा फक्त भारतातीलच नाही तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने आशियातील सर्वात मोठं गाव आहे.


गहमर हे गाव सैनिकांच गाव म्हणून सुद्धा ओळखलं जातं. या गावातील प्रत्येक घरातील एक तरी सदस्य हा भारतीय सैन्यदलात आपली सेवा वाजवत आहे.

Read Next Story