GK: हा मासा गिरगिटसारखा रंग बदलतो, तुम्हाला माहित आहे का नाव?

Tejashree Gaikwad
Aug 05, 2025


आपण नेहमी सरड्याचा रंग बदलण्याबद्दल ऐकलं असेल , पण समुद्रात असा एक मासा आहे जो आपला रंग बदलतो.


या अद्भुत क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेल्या मास्याचं नाव आहे कटल फिश


कटल फिश हा एक शिंवट वर्गातील (Cephalopod) समुद्री प्राणी आहे. ऑक्टोपस आणि स्क्विड हे याचे जवळचे नातेवाईक आहेत.


याच्या शरीरात एक 'कटलबोन' नावाचा कडक भाग असतो, जो त्याला पाण्यात तरंगण्यासाठी मदत करतो.


कटल फिशच्या त्वचेत क्रोमॅटोफोर्स (Chromatophores) नावाच्या पेशी असतात. या पेशींमध्ये विविध रंगांचे रंगद्रव्य असते.


या पेशी आकुंचन पावल्याने किंवा फुगल्याने त्वचेचा रंग क्षणार्धात बदलतो.


समुद्राच्या तळाशी मिसळून कटल फिश स्वतःला अदृश्य करतो.

Read Next Story