उठल्यानंतर थेट नाश्ता किंवा जेवण करणं हे आरोग्यासाठी घातक ठरू शकतं.
Tejashree Gaikwad
Aug 07, 2025
आयुर्वेदात दिलेले हे छोटे छोटे नियम, जर पाळले तर ते आयुष्यभर आरोग्य राखण्यास मदत करू शकतात.
अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की सकाळी उठल्यानंतर नाश्ता कधी करावा?
शरीराला ऊर्जा देणं महत्त्वाचं असतं, पण त्याचवेळी योग्य वेळेवर अन्न घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे.
आयुर्वेदानुसार, सकाळी उठल्यानंतर सुमारे 45 मिनिटं ते 1 तास शरीराला स्थिर होऊ द्यावं.
या वेळेत कोमट पाणी पिणं, थोडीशी हलकी योगासने करणं फायदेशीर ठरतं. त्यानंतरच अन्न घ्यावं, तेव्हाच ते पूर्णपणे पचतं आणि शरीराला योग्य पोषण मिळतं.
जर तुम्हीही सकाळी उठल्यानंतर लगेच खाण्याची सवय लावली असेल, तर ती आजपासून बदलणं गरजेचं आहे.
चुकीच्या वेळेवर खाल्ल्याने शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात आणि दीर्घकाळात ते अनेक समस्यांना निमंत्रण देऊ शकतात.
Disclaimer - (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. )